संविधान सभेची कार्य (Other functions Constituent Assembly)

संविधान सभेची कार्य (Other functions Constituent Assembly) कार्य खलील प्रमाणे आहेत.

1) भारताची राज्यघटना तयार करणे (the farming of Indian constitution) (राज्यघटनेची निर्मिती करतांना डॉ. राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष असायचे परंतू पहिले अस्थायी अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा हे होते.)

2) देशासाठी कायदे करणे (कायदे तयार करताना जी. व्ही मावळकरन हे संविधान सभेचे अध्यक्ष असायचे)

3) उद्देश पत्रिका (objectives Resolution) 13 डिसेंबर 1946 मांडली व 22 जानेवारी 1947 रोजी स्विकृत केली.

4) राष्ट्रीय झेंड्याची स्विकृती (22 जुलै 1947) केली.

(5) राष्ट्रीय गीत व राष्ट्रीयगाण (National song & National Anthem) यांची 24 जानेवारी 1950 स्विकृती केली.

6) विविध समित्यांची नियुक्ती करणे.

7) लोकसभा निवडणुका होईपर्यंत संविधान सभेने देशाची तात्पुरती “संसद” म्हणून 1952 पर्यंत कार्य पार पाडले.संविधान सभेद्वारे राज्यघटना निर्मितीच्या कार्यसाठी एकूण 11 अधिवेशन व त्यामध्ये संविधनसभेला 166 दिवस कार्य करावे लागले. तर मसुदा समितीला 144 दिवस कार्य करावे लागले. यासाठी संविधानसभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडली तर शेवटची बैठक ही 24 जानेवारी 1950 रोजी पार पाडली.

  • संविधान सभेने, 26 नोव्हेबर 1949 रोजी घटनेची स्विकृती 284 सदस्यांच्या स्वाक्षरीसह केली व 26 जानेवारी 1950 पासून राज्यघटनेचा अंमल सुरू करण्यात आला. पुढे या दिवसाला गणराज्य दिवस (Republic Day of India) म्हणून देखील साजरे केले गेले.

•. 26 जानेवारी हा दिवस राज्यघटनेचा अंमल दिवस म्हणून ठरविण्याचे कारण म्हणजे 1929 च्या लाहोर अधिवेशनात “पूर्ण स्वराज्याच्या ठराव” पारित करण्यात आला होता त्यानुसार 26 जानेवारी 1930 रोजी भारतामध्ये प्रथमच स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा करण्यात आला होता त्यामुळे या दिवसाला राज्यघटनेचा अंमल करण्याचे ठरविण्यात आले.

  • अशा प्रकारे ज्या दिवशी म्हणजेच 26 नोव्हेबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना अस्तित्वात आली त्याच दिवशी काही विशेष प्रवाधान देखिल लगेच अस्तित्वात आले होते जसे की निवडणूक, नागरिकता, संसदेचे तरतुद इत्यादी.